Jump to content

User:Yellawad Rajkumar

From Wikipedia, the free encyclopedia

प्रा.डॉ.राजकुमार किशनराव यल्लावाड (जन्म- ०५ ऑक्टोबर १९७५ ) कासराळ ता.उदगीर जि.लातूर येथे.

  सध्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, परळी वै.येथे मराठीविभाग प्रमुख म्हणून कार्यरत.
   डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या मराठी अभ्यास मंडळावर सलग दुसऱ्यांदा सदस्यपदी निवड.
   मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेच्या सचिवपदी कार्यरत असलेले यल्लावाड यांचे साहित्य चळवळीमध्ये विशेष असे योगदान आहे.
   कवी,समीक्षक,वक्ते,सूत्रसंचालक म्हणून ते सर्वदूर सुपरिचित आहेत.
   कवितेमध्ये मुक्तछंद,गझल,अभंग ,चारोळी ,वात्रटिका ,हायकू , लावणीअसे वैविध्यपूर्ण काव्यप्रकार त्यांनी हाताळलेले आहेत.
   अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व मराठवाडा साहित्य संमेलने यात निमंत्रित कवी व परिसंवादक म्हणून सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त.
   आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थ्यांनी विद्यावाचस्पती (पीएच्.डी) ही पदवी प्राप्त केलेली आहे.
    मराठीतील वेगवेगळ्या विषयावर त्यांचे आज पर्यंत सहा पुस्तक प्रकाशित आहेत.
    १.व्यावसायाभिमुख भाषिक लेखन कौशल्य माहिती व तंत्रज्ञान
    २.साहित्यविचार
    ३.मुद्रितमाध्यम लेखनतंत्र व कौशल्य
    ४.वस्तुनिष्ठ मराठी
    ५. सृजनामृत (संपा.)
    ६ .कादंबरी आकलन आणि आस्वाद